पाकिस्तानला एकदा तरी जाऊन यायचे हे माझे स्वप्न होते, ते एकदाच काय पाचदा पूर्ण झाले.
मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो. ते नेहमी पुण्यात यायचे तेव्हा मला भेटायचे. ते माझे मित्र बनले होते. कराचीत गेल्यावर त्यांना मी फोन केला, तेव्हा ते तातडीने मी ज्या ‘वायएमसीए’च्या अतिथीगृहात उतरलो होतो तिथे आले. त्यांनी मला कराचीचे संपूर्ण दर्शन घडवले. अगदी समुद्र किनाऱ्यावरही त्यांनी मला नेले. त्याच परिसरात क्लिफ्टन भाग येत असल्याचे लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटले की इथेच बेनझीर भुट्टो राहात असतील ना ? त्यांनी लगेचच प्रश्न केला




Reviews
There are no reviews yet.